-->
BLANTERWISDOM101

Maathi Motivation - Marathilok

Marathi Motivation

Marathi motivation

अनेक दिवसापासून सोशल मीडियावर एक काल्पनीक कथा व्हायरल होत आहे. एका श्रीमंत हिरे व्यापारी असलेल्या व्यक्तीच्या घरात उंदरांचा सुळसुळाट झाला होता. काही केल्या उंदरांचा त्रास कमी होत नव्हता. एकदा तर एका उंदरानं एक हिरा गिळला. परंतू इतक्या उंदरांपैकी कोणी हिरा गिळला हे शोधणं कठीण काम होतं. त्यासाठी त्यानं एका व्यक्तीला उंदीर मारून हिरा शोधून देण्याचं काम सांगितलं.

ज्याव्यक्तीला उंदीर मारण्यासाठी बोलावलं आहे तो हिरे व्यापाऱ्याच्या घरी आला. तो माणूस जेव्हा घरी आला तेव्हा घरातील सर्व उंदीर घोळका करून एकमेकांवर उड्यामारत खेळत होते. तर एक उंदीर या सर्वांपेक्षा एकटाच दूर वेगळा बसला होता. शिकाऱ्यानं त्या उंदराला पकडलं आणि त्याच्या पोटातून हिरा काढला.

अवघड असणारी ही गोष्ट त्या शिकाऱ्यानं काही वेळातच असून पूर्ण केली. हे पाहून त्या हिरे व्यापाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं त्या शिकाराल्या न राहून या विषयी विचारणा केली. तुम्ही इतक्या उंदरातून ज्यानं हिरा गिळलाय त्याच उंदराला कसं काय ओळखं? शिकाऱ्यानं उत्तर दिलं की, खूप सोपं काम होतं, जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!
Share This :

0 comments